‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:21 PM2018-08-10T23:21:27+5:302018-08-10T23:26:56+5:30

आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे

 Ten talukas of 'silk' will be employed on two employees: planting area will be reduced | ‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

Next

शरद जाधव ।
सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याचे दिसत आहे.

सांगली कार्यालयात कार्यरत असलेल्या चार कर्मचाºयांची अन्यत्र बदली करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आता केवळ दोन कर्मचाºयांवर अवलंबून आहे. रेशीम विकास अधिकारी या पदाचाही कारभार कोल्हापूरच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यात रेशीम शेती करणाºया शेतकºयांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.

विपरित नैसर्गिक परिस्थिती व बाजारपेठेचा भरोसा नसल्याने शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालनाकडे वळला आहे. त्यातच गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी करून दाखवित आहेत. अत्यंत कमी खर्चात व शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून रेशीम शेती करता येते. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. कमी कालावधित जादा उत्पादनाची हमी असल्याने जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळासह संपूर्ण जिल्ह्यातच थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जाते.

गेल्यावर्षी ३०० शेतकºयांनी ३२७ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी १ लाख १५ हजार अंडीपुंजांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यातून ७० टन रेशीम कोशाचे उत्पादन झाले. याप्रकारे शेतकºयांना रेशीम शेतीचा फायदा होत असतानाच, रेशीम संचालनालयाने अचानक ९ पैकी ४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या, तर एका कर्मचाºयाने स्वेच्छानिवृत्ती घेतली.
आता कार्यरत तीन कर्मचाºयांपैकी एकाकडे प्रशासन व ‘मनरेगा’चे कामकाज असते, तर उर्वरित दोन कर्मचाºयांकडेच जिल्ह्याचा कारभार आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकºयांपर्यंत पोहोचून काम करणे जिकिरीचे होणार आहे.

यंदा ३८२ एकरवर रेशीम शेतीचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, आता कर्मचारीच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरीही रेशीम उत्पादनास नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या चांगले काम केलेल्या कर्मचाºयांना पुन्हा नेमणूक देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

जिल्ह्यातील रेशीम शेती...
एकूण लागवड क्षेत्र : ३२७ एक र
रेशीम शेती करणारे शेतकरी : ३००
अंडीकोशांचे वाटप : १ लाख १५ हजार
रेशीम उत्पादन : ७० टन

Web Title:  Ten talukas of 'silk' will be employed on two employees: planting area will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.