नेर्लेत पोस्टात राहिलेले दहा हजार केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:27+5:302021-03-26T04:26:27+5:30
फोटो ओळ-नेर्ले, ता. वाळवा येथे पोस्ट मास्तर तुकाराम उंबरे यांचा प्रामाणिकपणाबद्दल शिवाजी सावंत यांनी सत्कार केला. बाजूस सुहास वायदंडे ...
फोटो ओळ-नेर्ले, ता. वाळवा येथे पोस्ट मास्तर तुकाराम उंबरे यांचा प्रामाणिकपणाबद्दल शिवाजी सावंत यांनी सत्कार केला. बाजूस सुहास वायदंडे व अन्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले येथील पोस्टमास्तर तुकाराम उंबरे विनम्र आणि कामाशी प्रामाणिक असणारी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. बुधवारी नागरिकाने पोस्टात विसरलेली दहा हजारांची रक्कम त्यांनी परत केली.
काळमवाडी येथील शिवाजी सावंत नेर्ले येथील पोस्ट कार्यालयामध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना पोस्टमास्तर उंबरे यांनी फोन लावून पैसे मोजून बघितले का, म्हणून विचारले; परंतु सावंत बाहेरगावी असल्याने त्यांनी सायंकाळी बघतो, म्हणून सांगितले. सायंकाळी घरी गेल्यानंतर पैसे मोजून बघितले असता १० हजार रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोस्ट मास्तरांना त्यांनी फोन लावून पैसे कमी असल्याचे सांगितले. त्यावर ‘तुमचे दहा हजार रुपये पोस्टात राहिलेले आहेत. ते घेऊन जा’ म्हणून सांगितले. सावंत दुसऱ्या दिवशी ते पैसे घेऊन गेले. पैसे मिळाल्यामुळे सावंत कुटुंबीयांना आनंद झाला. त्यांनी पोस्टमास्तर उंबरे यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला. यावेळी काळमवाडीचे पोस्टमास्तर सुहास वायदंडे, अरविंद माने आदी उपस्थित होते.