जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाचे दहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:00+5:302021-04-15T04:26:00+5:30
सांगली : जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाने दहाजणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येतही नव्याने ७६२ जणांची भर पडली. महापालिका क्षेत्रासह तासगाव, ...
सांगली : जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाने दहाजणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येतही नव्याने ७६२ जणांची भर पडली. महापालिका क्षेत्रासह तासगाव, खानापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ३१४ जण कोरोनामु्क्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, मृत्यूचे वाढते प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. मंगळवारी या वर्षात प्रथमच दहाजणांचा बळी गेला होता. बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी दहाजणांचा मृत्यू झाला. यात मिरज शहरातील एकासह खानापूर तालुक्यात ३, कडेगाव तालुक्यात २, तर कवठेमहांकाळ, पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात १९८, तर खानापूर तालुक्यात सर्वाधिक ८९, तासगाव ८२, तर मिरज तालुक्यात ६९ बाधित आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून, त्यात आरटीपीसीआरअंतर्गत २१६४ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ४६४ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १६३६ जणांच्या तपासणीतून ३१५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४८६९ वर पोहोचली असून, त्यातील ७८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ७०९ जण ऑक्सिजनवर, तर ७८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील ७, कोल्हापूर ५, सोलापूर ४ आणि पुणे येथील एकजण कोरोनाबाधित आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५७४९९
उपचार घेत असलेले ४८६९
कोरोनामुक्त झालेले ५०७५८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८७२
बुधवारी दिवसभरात
सांगली १३३
मिरज ६५
खानापूर ८९
तासगाव ८२
मिरज तालुका ६९
वाळवा ६५
आटपाडी ६०
कडेगाव ५२
शिराळा ४९
कवठेमहांकाळ ४१
पलूस ३१
जत २६