वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

By अशोक डोंबाळे | Published: April 10, 2024 01:48 PM2024-04-10T13:48:24+5:302024-04-10T13:49:51+5:30

सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे ...

Test by Vishal Patil group to fight in Lok Sabha from Vanchit, decision will be taken after the meeting | वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीअकोला येथे भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष लढण्याऐवजी वंचितकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी विशाल पाटील गटाकडून चाचपणी चालू आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सल्लाही दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.

सांगलीच्या जागेसाठी दिल्लीपर्यंत मजल मारूनही ठाकरेंनाच जागा सुटल्याने सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडाचा झेंडा उभारणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. आज सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. त्यानंतर बंडखोरी की वंचितकडून निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय होणार आहे.

बैठकीनंतर निर्णय होणार

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पलूसमध्ये बुधवारी सायंकाळी बैठक होत आहे. या बैठकीनंतर विशाल पाटील निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय होणार आहे. अपक्ष की वंचितकडून निवडणूक लढवावी, यावर निर्णय होणार आहे.

Web Title: Test by Vishal Patil group to fight in Lok Sabha from Vanchit, decision will be taken after the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.