सांगलीत अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:06 AM2017-07-27T01:06:25+5:302017-07-27T01:08:26+5:30

सांगली : ‘खोटे बोलणाºया राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘दिल्ली, मुंबईचं सरकार कायम म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय...’ अशा घोषणांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. अंगणवाडी कर्मचाºयांचे एप्रिलपासूनचचे थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्या.

Thangalad of Sangalyat Aanganwadi Sevikas | सांगलीत अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

सांगलीत अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

Next
ठळक मुद्दे♦जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आंदोलनास हजेरी लावली.♦दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही ♦राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी नेमलेल्या शिफारशी स्वीकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, ♦लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत

सरकारविरोधात जोरदार घोषणा : सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘खोटे बोलणाºया राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘दिल्ली, मुंबईचं सरकार कायम म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय...’ अशा घोषणांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. अंगणवाडी कर्मचाºयांचे एप्रिलपासूनचचे थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्यावी, खाण्यायोग्य आहार द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आंदोलनास हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष स्रेहलता कोरे, आनंदी भोसले, नादिरा नदाफ, अरुणा झगडे यांनी नेतृत्व केले.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सरकारविरोधात असंतोष आहे. राज्य सरकारमधील महिला, बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र अंमलबजावणी केली जात नाही, याबद्दल अंगणवाडी सेविकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
यावेळी मंगला सराफ म्हणाल्या की, राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी नेमलेल्या शिफारशी स्वीकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, अंगणवाडीतील मुलांना खाण्यायोग्य आहार द्यावा, आहारासाठी प्रतिलाभार्थी ४.४२ रुपये मिळतात. त्यात तिपटीने वाढ करावी, मार्चपासूनचे मानधन तातडीने द्यावे, एप्रिल २०१४ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना सेवासमाप्तीची रक्कम तातडीने द्यावी, लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत आले आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा फरक द्यावा, रिक्त जागांवर सेविका, मदतनीसांची नेमणूक करावी, प्रवास खर्चाची २०११ पासूनची रक्कम मिळावी आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास दि. ११ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व अंगणवाड्या बेमुदत बंद ठेवण्यात येतील.
आंदोलनामध्ये कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे,अलका विभूते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, कल्पना पवार, माधुरी जोशी, मथुरा कांबळे, सुलोचना पाटील, सरला घोडे, बिस्मिल्ला मुल्ला, सुरेखा गायकवाड, जयश्री जाधव, कस्तुरा पट्टणशेट्टी, अरुणा जोशी, दयावती अजेटराव, मंगल माळी यांच्यासह सेविका व मदतनीस सहभागी होत्या.

Web Title: Thangalad of Sangalyat Aanganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.