आंदोलनाची तीव्रता वाढली! संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:29 AM2022-02-28T10:29:52+5:302022-02-28T10:45:31+5:30

Sangli: ही घटना रविवारी रात्री घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा उद्रक घडण्याची शक्यता आहे. 

The agitation intensified! Angry farmers set fire to MSEDCL office in Sangali | आंदोलनाची तीव्रता वाढली! संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

आंदोलनाची तीव्रता वाढली! संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

Next

सांगली : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या,  या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच कासबेदिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली. 

गेल्या सात दिवसा पासून माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनस बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या, आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याचं प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळेच शेतकऱ्याच्या मध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळेच रविवारी रात्री उशिरा सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबेदिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले.

कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खक झाले. आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आग विजवत होते. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यातही आंदोलनाचे धग वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: The agitation intensified! Angry farmers set fire to MSEDCL office in Sangali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.