सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या..

By अविनाश कोळी | Published: August 29, 2022 01:54 PM2022-08-29T13:54:45+5:302022-08-29T13:56:30+5:30

चोर गणपती पहाण्यासाठी भाविकांनी केली होती गर्दी

The arrival of Chor Ganesha a part of Sangli Panchayat Ganeshotsav | सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या..

सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या..

googlenewsNext

सांगली : पावणे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन रविवारी झाले. सोमवारी महापूजा झाल्यानंतर या गणपतीने निरोप घेतला.

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते. मंदिरातील संस्थान गणशोत्सवाची सुरुवात ‘चोर गणपती’च्या आगमनाने होते. मंदिरातील गाभाऱ्यात या गणपतीच्या मूर्ती विधिपूर्वक बसविल्या जातात.

या गणपतीची अख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ आहे. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत, असे जाणवणारही नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते.

चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी महापूजा, प्रसाद असा कार्यक्रम पार पडल्यानंतर चोर गणपतीने गुपचूप निरोप घेतला. आता ३१ ऑगस्टपासून पंचायतनचा उत्सव सोहळा सुरू होईल.

Web Title: The arrival of Chor Ganesha a part of Sangli Panchayat Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.