बेपत्ता बहिण-भावाचा मृतदेह अखेर दुसऱ्या विहिरीत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:58 PM2023-02-12T15:58:02+5:302023-02-12T15:58:15+5:30
तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे.
जत :
तालुक्यातील अमृतवाडी येथील लहान बहीण व भाऊ बेपत्ता झालेले दोघांचे मृतदेह घाराजवळीलच शेजारील दुसऱ्या विहिरीत दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. त्यामूळे तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे.
मयत सुलोचना गवळी (वय ५) व इंद्रजित गवळी (वय ३) यांचे नाव आहे. चार दिवसापूर्वी गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी अमृतवाडी येथील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याने पोलीसांनी गावात सर्व गाव जंग जंग पछाडले मात्र त्यांना हाती कांहीच लागले नाही. शेततळ्यात व विहिरीतील पाणी उपसा करून ही सापडले नाहीत.
शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी गावात तळ ठोकून होते. जत येथील द्राक्ष बागायतदार दिपक हत्ती यांच्या शेतात काम करण्यासाठी नाशिक हून एक जोडपे ठेवले होते. जोडप्यातील पत्नी ही आजारी असल्याने तिला खाजगी रूग्णालयात पतीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले होते. त्यामूळे त्यांची चार मुले घरी होती. बहीण- भाऊ असे दोन लहान मुले सायंकाळी वडील घरी आले. दोन मुले झोपली होती तर दोन मुले घरी नसल्याने त्यांचा शोध घेऊन जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लहान मुले लांब जाऊ शकणार नाहीत, हा अंदाज घेऊन जवळच खेळत खेळत विहीर अथवा शेत तलावात मुले पडली असावीत, असा अंदाज घेऊन विहीर व शेत तलावातील पाणी उपसून काढण्यात आले. मात्र त्यात मुले सापडली नाहीत. मात्र काल रविवारी या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने गावात शोककळा पसरली आहे. चार दिवस पोलीस अमृत्वाडी गावात तळ ठोकून होते. अखेर दोघांचेही मृतदेह सापडल्याने पोलीसांनी देखील सुटकारा सोडला.