चांदोली धरण पन्नास टक्के भरले, मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठी आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:56 PM2022-07-11T17:56:25+5:302022-07-11T17:57:08+5:30
वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या सहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे ...
वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या सहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातीलपाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन सहा दिवसांत धरण पन्नास टक्के भरले आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पावसाचे आगार आहे. वार्षिक सरासरी साडेचार ते पाच हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. यंदा पाच जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. त्यावेळेपासून अतिवृष्टी होत आहे. सलग सहा दिवसांच्या मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात तब्बल सात टीएमसीने पाणीसाठा वाढला.
सध्या धरणात १७.६० टीएमसी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी ५१.१६ अशी आहे. पाणीपातळी ६०७ मीटर झाली आहे. धरणातून ७६५ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातून ११ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक होत असून गेल्या चोवीस तासांत ६० मिलीमीटरसह एकूण ७२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.