२०१९ मधील महापुराची भरपाई मिळालीच नाही, पूरग्रस्तांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संतोष भिसे | Published: October 4, 2022 05:55 PM2022-10-04T17:55:48+5:302022-10-04T17:56:54+5:30

बॅंक खात्यांवर अनुदान जमा होईल असे आश्वासन दिले होते, तरीही अनुदान मिळाले नाही

The compensation for the 2019 flood has not been received, Sangli of the flood victims stood in front of the collector office | २०१९ मधील महापुराची भरपाई मिळालीच नाही, पूरग्रस्तांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

२०१९ मधील महापुराची भरपाई मिळालीच नाही, पूरग्रस्तांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Next

सांगली : पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांना सन २०१९ मधील महापुराचे सानुग्रह अनुदान अजूनही मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ २२ गावांतील पूरग्रस्तांनी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला.

पुरामध्ये घरांची पडझड व अन्य नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना ९५ हजार १०० रुपये अनुदान मंजुर झाले आहे, पण लाभार्थ्यांच्या खात्यांवर अद्याप जमा झालेले नाही. यासंदर्भात २० सप्टेंबररोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत बॅंक खात्यांवर अनुदान जमा होईल असे आश्वासन दिले होते, तरीही अनुदान मिळाले नाही. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले.

आंदोलनात संग्राम थोरबोले, तानाजी गेजगे, बाजीराव मोरे, तानाजी गेजगे, शंकर ऐवळे, विलास वायदंडे, फारुख बेपारी, सुगंध वायदंडे, महेश चांदणे, अश्विनी वायदंडे, सुनिता लोंढे, ताई चव्हाण, जयवंत चव्हाण आदी सहभागी झाले.

Web Title: The compensation for the 2019 flood has not been received, Sangli of the flood victims stood in front of the collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.