एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांवर आता करडी नजर

By संतोष भिसे | Published: April 7, 2023 05:56 PM2023-04-07T17:56:01+5:302023-04-07T17:56:54+5:30

संतोष भिसे सांगली : भूम एसटी आगारात मोडक्या-तोडक्या एसटीवर मुख्यमंत्री व राज्य शासनाची जाहिरात केल्यानंतर प्रचंड गहजब झाला. ‘राष्ट्रवादी’चे ...

The corporation started a strict campaign against the ST buses if they were defective | एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांवर आता करडी नजर

एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांवर आता करडी नजर

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : भूम एसटी आगारात मोडक्या-तोडक्या एसटीवर मुख्यमंत्री व राज्य शासनाची जाहिरात केल्यानंतर प्रचंड गहजब झाला. ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. भूमच्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांविरोधात महामंडळाने कडक मोहीम सुरू केली आहे.

मुंबईत मध्यवर्ती स्थानकात आठवडाभरापूर्वी केलेल्या तपासणीत १० गाड्यांमध्ये दोष आढळले. अहमदनगर, सांगली, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, बीड, पुणे व सोलापूर विभागातील या गाड्या होत्या. त्यामुळे यांत्रिकी विभागाच्या महाव्यवस्थापकांनी या विभागांना नोटिसा जारी केल्या आहेत.

त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या विभागात गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नाही.  मुंबईत तपासणीअंती दोष सापडलेल्या गाड्यांबाबत जबाबदारी निश्चित करावी. संबंधितांवर कारवाई करावी. आढळलेल्या त्रुटी त्वरित दूर कराव्यात. गाडीमध्ये दोष असतानाही, ती प्रवासी वाहतुकीसाठी का दिली? याची जबाबदारी निश्चित करावी. कारवाईचा अहवाल त्वरित द्यावा. अशा सदोष गाड्या भविष्यात रस्त्यावर येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.

मुंबईतील तपासणीत आढळलेले दोष असे : कोपरगाव (अहमदनगर) : दोन आसने फाटलेली, गाडीचा रंग उडालेला, हेडलाईटचे कव्हर निघालेले. शिराळा (सांगली) : गिअरच्या लिव्हरवर कव्हर नाही. राजापूर (रत्नागिरी) : लिव्हरचे कव्हर फाटलेले, गाडीचा रंग उडालेला. भोर (पुणे) : पुढील काच फुटलेली, आसनांची पुशबॅक बटणे खराब. श्रीवर्धन (रायगड) : आसने धुळीने माखलेली. चिपळूण (रत्नागिरी) : चालकापुढील बल्ब फुटलेला, बम्परही तुटलेले. करमाळा (सोलापूर) : गाडीत अस्वच्छता, प्रवाशांसाठीचे पडदे धुळीने माखलेले, पुढील काच पूर्णत: फुटलेली. बीड : गिअरवरील कव्हर फाटलेले. गेवराई (बीड) : प्रवाशाचे स्लीपर आसन धुळीने माखलेले.

कोल्हापूरकरांनी पंख्याच्या पट्ट्याने दरवाजा बांधला!

कोल्हापूर आगाराच्या गाडीतील मागील बाजूच्या संकटकालीन खिडकीच्या दरवाजाचे लॉक तुटले होते. यंत्र शाळेतील कर्मचाऱ्यांनी कल्पकता दाखवीत दरवाजा चक्क फॅन बेल्टने बांधल्याचे आढळले. यातुन एसटी बसची आवस्था समोर येत आहे.

Web Title: The corporation started a strict campaign against the ST buses if they were defective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली