..अन् अचानकच झाला मोबाईलचा स्फोट, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; पुणे-बेंगळुरु महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:27 AM2023-04-03T11:27:21+5:302023-04-03T11:27:44+5:30

परिसरातील लोक अचंबित

The explosion of the mobile phone happened suddenly, the accident was averted due to the driver intervention | ..अन् अचानकच झाला मोबाईलचा स्फोट, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; पुणे-बेंगळुरु महामार्गावरील घटना

..अन् अचानकच झाला मोबाईलचा स्फोट, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; पुणे-बेंगळुरु महामार्गावरील घटना

googlenewsNext

मानाजी धुमाळ

रेठरे धरण : पुणे-बेंगळुरु आशियाई महामार्गावर दुचाकी स्लिप होवून दुचाकीस्वाराच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. अचानक घटलेल्या या घटनेमुळे दुचाकीस्वाराने मोबाईल रस्त्यावर टाकून पळ काढला. चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. 

ऋषिकेश पवार हे नेहमीप्रमाणे कोल्हापूरहून कराडकडे कामावर निघाले होते. दरम्यान, कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे ऋषिकेश यांच्या दुचाकीच्या पुढील वाहनाने अचानक वळण घेतल्यामुळे ताबा सुटून त्यांची दुचाकी घसरली. याचवेळी ऋषिकेश यांच्या पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईलचा रस्त्याबरोबर घर्षण होऊन स्फोट झाला.

ऋषिकेशने प्रसंगावधान राखत मोबाईल रस्त्यावर फेकून दिला. यामुळे दुर्घटना टळली. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने ऋषिकेश घाबरले. दरम्यान महामार्गावरील नागरिक मदतीला धावले तर येवलेवाडी फाटा परिसरातील लोक अचंबित झाले होते.

Web Title: The explosion of the mobile phone happened suddenly, the accident was averted due to the driver intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.