सांगली महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदतवाढ रोखली

By शीतल पाटील | Published: July 31, 2023 07:39 PM2023-07-31T19:39:04+5:302023-07-31T19:51:12+5:30

स्थायी समिती सभा : कंपनीचे संचालक गैरहजर

The extension of Sangli Municipal Corporation's LED project was stopped | सांगली महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदतवाढ रोखली

सांगली महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदतवाढ रोखली

googlenewsNext

सांगली : महापालिका क्षेत्रात एलईडी बसविण्याचा ठेका समुद्रा कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकल्पाची मुदत संपल्याने प्रशासनाने स्थायी समिती मुदतवाढीचा प्रस्ताव आणला होता. पण कंपनीचे संचालक अथवा वरिष्ठ अधिकारी सभेला उपस्थित नसल्यावरूनही सदस्यांनी नापसंती व्यक्त केली. कराराचे मराठी भाषांतरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रकल्पास मुतवाढीचा विषय रोखण्यात आला.

स्थायी समितीची सभा सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवक फिरोज पठाण, निरंजन आवटी, जगन्नाथ ठोकळे, प्रकाश ढंग, पवित्र केरीपाळे, नसीम शेख, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होते.

एलईडी प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. या प्रकल्पाचे काम सहा महिने बंद आहे. प्रशासनाने मुदतवाढीचा विषय स्थायी समितीत आणला होता. मात्र समुद्रा कंपनीचे जबाबदार प्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी सभेला उपस्थित नव्हते. प्रकल्पाचे काम किती पूर्ण झाले, किती अपूर्ण आहे, याचीही माहिती सदस्यांना मिळू शकली नाही. प्रकल्पाचे काम बंद असल्यावरून सदस्यांनी संताप व्यक्त केला. कराराचे मराठी भाषांतरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे मुदतवाढीचा विषय प्रलंबित ठेवण्याचे निर्देश सभापती सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले. स्थायी समिती सभा शुक्रवारी होणार आहे. त्या सभेपुढे हा विषय पुन्हा आणला जाणार आहे. शाळांमधील दाखल्यांचे संगणकीकरणचा विषय नगरसेवक ठोकळे यांनी मांडला. सर्व दाखल्यांचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय झाला. महापालिकेकडील ९७९ मानधनी कर्मचाऱ्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा विषय पुढील सभेपुढे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
 

Web Title: The extension of Sangli Municipal Corporation's LED project was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.