Sangli: इलेक्ट्रिक वाहनधारकांची चिंता मिटली, खानापूर नगरपंचायतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:06 PM2024-06-27T16:06:10+5:302024-06-27T16:07:42+5:30

खानापूर : खानापूर परिसरातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता या वाहनांसाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून ...

The facility of charging point has been made available by Khanapur Nagar Panchayat for electric vehicles | Sangli: इलेक्ट्रिक वाहनधारकांची चिंता मिटली, खानापूर नगरपंचायतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा केली

Sangli: इलेक्ट्रिक वाहनधारकांची चिंता मिटली, खानापूर नगरपंचायतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा केली

खानापूर : खानापूर परिसरातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता या वाहनांसाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या वापरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे खानापूर परिसरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता वाढू लागली आहे. 

खानापूर परिसरात वाहनांचे चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या वाहनांसाठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉइंटची सुविधा खानापूर नगरपंचायतीने नगरपंचायतीच्या आवारात उपलब्ध करून दिली आहे. या चार्जिंग पॉइंटचा परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. 

Web Title: The facility of charging point has been made available by Khanapur Nagar Panchayat for electric vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.