स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे धाडस नाही - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:02 PM2024-09-06T14:02:22+5:302024-09-06T14:03:46+5:30

'मानसिंगराव नाईक आमच्याच पार्टीचे'

The government does not have the courage to hold elections to local bodies says Jayant Patil  | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे धाडस नाही - जयंत पाटील 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे धाडस नाही - जयंत पाटील 

इस्लामपूर : राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका घेण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. त्यातच त्यांनी विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. मालवणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास जनता खपवून घेणार नाही, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.

ढगेवाडी (ता. वाळवा) येथील नूतन ग्राम सचिवालय आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच संदीप सावंत यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, संचालक रामराव पाटील, दीपक पाटील, अमरसिंह साळुंखे, ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत, बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड, कार्वेचे सरपंच शहाजी पाटील, ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, देवर्डेचे सरपंच अनंत पाटील, उपसरपंच स्नेहल माने उपस्थित होते. वैभव माने यांनी आभार मानले.

मानसिंगराव आमचेच..

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेविषयी विरोधकांत आजही संभ्रम आहे. आमदार नाईक शरद पवार गटाचे की, अजित पवार गटाचे? यावरून कार्यकर्त्यांत उलट-सुलट चर्चा होती. कार्यक्रमात ‘मानसिंगराव नाईक आमच्याच पार्टीचे आहेत,’ असे सांगत आमदार जयंत पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

Web Title: The government does not have the courage to hold elections to local bodies says Jayant Patil 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.