सांगली जिल्हा बँकेतील चौकशी समिती मुदतवाढ मागणार, प्रकरणाची व्याप्ती अधिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 05:10 PM2023-01-17T17:10:48+5:302023-01-17T17:11:12+5:30

चौकशी करणाऱ्या समितीला ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

The investigation committee in Sangli District Bank will ask for extension, the scope of the case is more | सांगली जिल्हा बँकेतील चौकशी समिती मुदतवाढ मागणार, प्रकरणाची व्याप्ती अधिक 

संग्रहीत फोटो

Next

सांगली : जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराबद्दल केलेल्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या समितीला ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याने समितीमार्फत मुदतवाढ मागण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

चौकशी समितीचे अध्यक्ष, विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्यासह विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी गेली आठवडाभर चर्चा सुरू आहे. तक्रार अर्जामध्ये नमूद करण्यात आलेले मुद्दे, त्याप्रमाणे चौकशीवेळी निदर्शनास आलेल्या मुद्यांची चौकशी केली जाईल. त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल पूरक कागदपत्रांसह ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्यास सहकार विभागाने सांगितले आहे, मात्र प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने मुदतवाढ मागण्याची तयारी पथकाने केली आहे.

बँकेच्या कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हा बँकेतील कारभाराबाबत सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देऊन समिती नियुक्त करण्यात आली आहे. सध्या बँकेत चौकशी सुरू आहे.

Web Title: The investigation committee in Sangli District Bank will ask for extension, the scope of the case is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.