‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Published: September 8, 2023 06:42 PM2023-09-08T18:42:18+5:302023-09-08T18:42:59+5:30

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून ...

The name of India should not be changed hastily says Raju Shetty | ‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

googlenewsNext

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून लगेच तडकाफडकी देशाचे नावात बदल करून ‘इंडिया’चे भारत करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही नाव बदल्यामुळे सर्व कागदपत्रांसह चलनी नोटा, नाणी बदलावी लागणार आहेत. नोटबंदीच्या त्रासातून आजही जनता सावरली नाही, तोपर्यंत नवीन त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.

काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. याला विरोध करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने ‘इंडिया’चे भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना भूमिका विचारली. यावेळी राजू शेट्टी सांगलीत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये. त्याला तांत्रिक अडचण आहे. यासाठी पैसाही प्रचंड लागेल. भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा, नाणी बदलावी लागतील. नोटबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का ? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा आदी उपस्थित होते.

‘स्वाभिमानी’ स्वतंत्रच लढणार

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. या सरकारला तीव्र विरोध करण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत. सत्ता कुणाचीही असली तरी त्यामध्ये साखर कारखानदारांची लॉबी आहेच. हे कारखानदार शेतकऱ्यांचे कधीच हित पाहणार नाहीत. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबर न जाता राज्यात स्वाभिमानी पक्ष स्वतंत्रच लढणार आहे. मी स्वत: हातकणंगले लोकसभा आणि सांगलीसह अन्य मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

रविकांत तुपकर स्वाभिमानी बरोबरच

बुलढाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांनीच संघटनेबरोबर असल्याचा खुलासा केला आहे. तुपकरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. ते संघटनेत लवकरच सक्रीय सहभागी होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.

Web Title: The name of India should not be changed hastily says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.