सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला, नवमतदारांची नोंदणी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:22 PM2024-02-21T17:22:34+5:302024-02-21T17:23:13+5:30

प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी 

The percentage of women voters has decreased in Sangli district, the registration of new voters continues | सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला, नवमतदारांची नोंदणी सुरूच

सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला, नवमतदारांची नोंदणी सुरूच

सांगली : जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ५१ हजार ६८९ ने कमी झाली असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधून समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण २४ लाख नऊ हजार ७७ मतदारांची नोंदणी आहे. ६७ हजार ७५२ नवीन मतदार नोंदले गेले आहेत. त्यात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे.

जिल्ह्यात २४ लाख नऊ हजार ७७ एकूण मतदारांची संख्या आहे. मागील लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत सहा लाख मतदारांची नव्याने भर पडली आहे. मिरज, सांगली आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात तीन ते सव्वातीन लाख मतदारांची संख्या आहे. उर्वरित मतदारसंघांत तीन लाखांच्या आतच मतदारांची संख्या आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे.

नवमतदारांची नोंदणी सुरूच

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी निश्चित केली आहे. विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली होती. यामुळे नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केल्याने नवमतदारांचा टक्का वाढला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजूनही मतदारांची नोंदणी सुरूच असल्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.

पुरुषांच्या तुलनेत महिला ५१६८९ कमी

पुरुष : १२३०३२६
महिला : ११७८६३७

विधानसभानिहाय आकडे काय सांगतात?

विधानसभा मतदारसंघ - पुरुष - महिला

मिरज- १६२३६६ - १५७६१२
सांगली- १६७३१४ - १६४२८५
इस्लामपूर- १३६८७४ - १३२२३३
शिराळा- १५१६२४  - १४३८८२
पलूस-कडेगाव-१४२३७१ - १४०६२६
खानापूर- १६९६९६  - १६२३४०
तासगाव-कवठेमहांकाळ-१५२७०६ - १४५५११
जत-  १४७३७५ - १३२१४८

Web Title: The percentage of women voters has decreased in Sangli district, the registration of new voters continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.