होळीला महिला पुरुषांना काठीने बदडतात, कुठे अन् काय आहे नेमकी प्रथा..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:51 PM2023-03-09T16:51:15+5:302023-03-09T16:51:35+5:30

शेकडो वर्षांची होळीची ही प्रथा अद्याप सुरू

The practice of beating men with sticks by women on the occasion of Mirj Holi festival | होळीला महिला पुरुषांना काठीने बदडतात, कुठे अन् काय आहे नेमकी प्रथा..जाणून घ्या

होळीला महिला पुरुषांना काठीने बदडतात, कुठे अन् काय आहे नेमकी प्रथा..जाणून घ्या

googlenewsNext

मिरज : मिरजेत होळी सणानिमित्त पुरुषांना महिलांनी काठीने मारण्याची प्रथा गोसावी समाजात आहे. मिरजेत उत्तमनगर येथे होळीनिमित्त महिलांनी पुरुषांना काठीने बदडण्याचा खेळ पार पडला.

मिरजेत गोसावी समाजातर्फे आयोजित होळी कार्यक्रमात महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात.  शेकडो वर्षांची होळीची ही प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. महाराष्ट्रात गोसावी समाज मोलमजुरी भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धार्मिक व रूढी परंपरावादी असल्याने गोसावी बांधव अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. मिरजेतील उत्तमनगर परिसरात गोसावी समाजातर्फे दरवर्षी उत्साहात होळी सण साजरा करण्यात येतो. 

होळीच्या तिसऱ्या दिवशी काठीचा खेळ खेळण्यात येतो. होळी पेटविलेल्या ठिकाणी महिला झेंडा घेऊन उभे राहतात. पुरुष हा झेंडा पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. झेंडा पळवून नेणाऱ्या पुरुषांना महिला काठीने बदडतात. पुुरुष केवळ बचावाचा प्रयत्न करतात. होळीनिमित्त  शेकडो वर्षांची ही झेंड्याच्या खेळाची परंपरा  गोसावी समाज बांधवांनी  टिकविली आहे.

खेळ पाहण्यास गर्दी

यावर्षीही हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गोसावी समाजाची ही परंपरा पाहण्यासाठी व खेळाचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. 

Web Title: The practice of beating men with sticks by women on the occasion of Mirj Holi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.