मराठा आंदोलनाचे लोण परराज्यात, आग्रात गलाई व्यावसायिकांचे आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
By संतोष भिसे | Published: October 31, 2023 04:42 PM2023-10-31T16:42:25+5:302023-10-31T16:44:17+5:30
विटा : आरक्षणासाठी परप्रांतातील मराठा बांधवदेखील आक्रमक झाले आहेत. गलाई व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या व्यावसायिकांनी आग्रा येथे ठिय्या ...
विटा : आरक्षणासाठी परप्रांतातील मराठा बांधवदेखील आक्रमक झाले आहेत. गलाई व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या व्यावसायिकांनी आग्रा येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला.
आंदोलनात खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, माण तसेच खटाव यासह अन्य तालुक्यांतील मराठा व्यावसायिक सहभागी झाले. गावापासून शेकडो मैलांवर असूनही आंदोलन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश ट्रस्टच्या माध्यमातून आंदोलनाची वज्रमूठ घट्ट केली. ट्रस्टचे महासचिव सर्जेराव देशमुख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. `एक मराठा, लाख मराठा` च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अध्यक्ष सुभाष वलेकर, उपाध्यक्ष दिलीप कदम, कोषाध्यक्ष लालासाहेब महिंद, सुनील पाटील, काशीनाथ मुळीक, धनाजी सूर्यवंशी, विलास पवार, संजय पवार, संभाजी पाटील, रघुनाथ देवकर, अशोक पाटील, अनिल खापे, मोहन महाडिक, सतीश महाडिक, तानाजी मोकाशी, प्रकाश चव्हाण, शरद भंडारे, तानाजी माने, तुळशीराम सूर्यवंशी, विजय यादव, बालाजी कदम, संजय कुंभार, रवींद्र कदम हेदेखील सहभागी झाले.