अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:00 PM2023-01-09T16:00:44+5:302023-01-09T16:01:50+5:30

सांगलीत रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात भक्तांशी साधला संवाद

The Ram temple in Ayodhya will be completed within the next year, Treasurer of Ram Mandir expressed confidence | अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास 

अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास 

Next

सांगली : अयोध्येत सुरू असलेले भव्य राम मंदिराचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा विश्वास राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर आयोजित रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात त्यांनी सांगलीकर भक्तांशी संवाद साधला. शेकडो सांगलीकरांनी या कीर्तन सोहळ्यास हजेरी लावली. गोविंद गिरी महाराज म्हणाले, मंदिराचे बांधकाम खूप उत्तम पद्धतीने आणि गतीने सुरू आहे. येत्या वर्षभरात ते पूर्णत्त्वास जाईल. जानेवारी २०२४मध्ये ते पूर्ण होईल.

शनिवारी श्रीराम कथा, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम, महाप्रसाद झाला. राम कथेचा तिसरा दिवस होता. यामध्ये प. पू. समाधान शर्मा यांनी राम जन्मोत्सवाचे रसभरीत वर्णन केले. यावेळी भाविकांनी श्रीरामाचा जयजयकार करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. राम कथेस प्रारंभ करण्यापूर्वी मनोहर सारडा आणि परिवार, पंडितराव पाटील, विजयराव गवळी यांच्या हस्ते समाधान महाराज शर्मा यांना पुष्पहार अर्पण केला. 

दररोज कथा, हरिपाठ, कीर्तन कार्यक्रम 

दररोज सात ते आठ हजार भक्तांच्या उपस्थितीत कथा, हरिपाठ, कीर्तन पार पडत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे कार्यक्रम सुरू असून, यात आरोग्य शिबिर, पारायण, हरिपाठ, असा नित्य दिनक्रम सुरू आहे. आज हभप श्री गुरू कृष्ण महाराज चौरे यांचे नामसंकीर्तन झाले. त्यांनी श्रीराम जन्मभूमी या विषयावर मार्गदर्शन केले.

Web Title: The Ram temple in Ayodhya will be completed within the next year, Treasurer of Ram Mandir expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.