Sangli: रिक्षा चालकाने खड्डे मुजविले, अन् महापालिका प्रशासन जागे झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:04 PM2023-07-29T14:04:26+5:302023-07-29T14:11:23+5:30

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या

The rickshaw puller plowed potholes on the Kupwad to Vijayanagar road in Sangli | Sangli: रिक्षा चालकाने खड्डे मुजविले, अन् महापालिका प्रशासन जागे झाले

Sangli: रिक्षा चालकाने खड्डे मुजविले, अन् महापालिका प्रशासन जागे झाले

googlenewsNext

कुपवाड : कुपवाड ते विजयनगर रस्त्यावर चाणक्य चौकाजवळील रस्त्यावर दोन खड्डे पडले आहेत. सदरचे खड्डे मुजवावेत, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले. महापालिका लक्ष देत नसल्याने अखेर शुक्रवारी एका रिक्षा चालकाने रिक्षातून खडी आणून दोन्ही खड्डे मुजविले. रिक्षा चालकाच्या या कामाबद्दल अनेकांनी कौतुक केले.

कुपवाड ते चाणक्य चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. तसेच खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा दिसून येत नव्हता. त्यामुळे खड्डे मुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु प्रशासनाने डोळेझाक केली होती. शुक्रवारी एका रिक्षा चालकाने स्वतःच्या रिक्षात खडी भरून आणली. ती खडी दोन्ही खड्ड्यांत टाकून ते मुजविले. रिक्षा चालकाच्या या कामाबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल अनेकांनी आभार मानले.

महापालिकेला आली जाग

रिक्षाचालक प्रकाश काळगे यांची खड्डे मुजवितानाची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या. त्यानंतर महापालिका प्रशासनालाही जाग आली. प्रशासनानेही खड्डे मुजविण्याची मोहीम हाती घेतली.

लेखापरीक्षण करा : साखळकर

महापालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण कामाचा दर्जा चांगला नसतो. त्यावर पॅचवर्कवरही निधी खर्च होतो. गेल्या चार वर्षात पॅचवर्क कामावर किती कोटी खर्च झाले, याचे विशेष लेखापरीक्षण केल्यास अनेक भानगडी बाहेर येतील, असे नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले.

Web Title: The rickshaw puller plowed potholes on the Kupwad to Vijayanagar road in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली