सांगली जिल्ह्यात ‘महसूल’च्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती; उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांवर कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 07:02 PM2023-02-13T19:02:34+5:302023-02-13T19:03:05+5:30

सांगली : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद महिला अधिकाऱ्यांकडे आहे. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीपदी महिला विराजमान आहेत. जिल्हाधिकारी ...

the rope of 'revenue' management is in the hands of women In Sangli district; Working as Deputy Collector, Tehsildar | सांगली जिल्ह्यात ‘महसूल’च्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती; उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांवर कार्यरत

सांगली जिल्ह्यात ‘महसूल’च्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती; उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांवर कार्यरत

googlenewsNext

सांगली : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद महिला अधिकाऱ्यांकडे आहे. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीपदी महिला विराजमान आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने त्यांच्या पदाची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख सांभाळत आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या सर्व पदांवर महिलाच अधिकारी असून, चार महिला तहसीलदार कार्यरत आहेत. महिला अधिकाऱ्यांकडून सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जात आहे. 

प्रश्नांची सोडवणूक आणि जाण 

वरिष्ठ अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रश्न, ते सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना त्यांना माहिती आहेत. 

महिला अधिकारी

  • डॉ. स्वाती देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी
  • मौसमी चौगुले, निवासी उपजिल्हाधिकारी
  • मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी, महसूल
  • हर्षलता गेडाम, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
  • विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
  • शिल्पा ओसवाल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी
  • तेजस्विनी पाटील, तहसीलदार, पुनर्वसन


जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेलया तहसीलदार

  • बाई माने, आटपाडी
  • शैलजा पाटील, कडेगाव
  • धनश्री शंकरदास, अप्पर तहसीलदार, आष्टा
  • अर्चना पाटील, अप्पर तहसीलदार, सांगली


जाणीव आणि निर्णयक्षमता

महिला अधिकाऱ्यांसमोर अनेक महिला आपल्यावर झालेला अन्याय मांडत असतात. दिवाणी स्तरावरील प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तर आता विधी सेवा प्राधिकरणाचीही मदत घेण्यात येत आहे.

Web Title: the rope of 'revenue' management is in the hands of women In Sangli district; Working as Deputy Collector, Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.