शाळेला राजवाड्याचे रूप, सांगलीतील समडोळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरतेय लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:53 PM2023-03-11T18:53:09+5:302023-03-11T18:53:35+5:30

ज्ञानदान करणाऱ्या शाळेचा कायापालट

The school looks like a palace, the Zilla Parishad school at Samdoli in Sangli | शाळेला राजवाड्याचे रूप, सांगलीतील समडोळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरतेय लक्षवेधी 

शाळेला राजवाड्याचे रूप, सांगलीतील समडोळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरतेय लक्षवेधी 

googlenewsNext

सचिन ढोले

समडोळी : शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो, तर ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला नवा आयाम मिळू शकतो. हाच विचार करुन समडोळी  (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.

मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यात आले. कोरोनाच्या काळात खुल्या वातावरणातील शिक्षणावर संक्रांत आली. अडचणींवर मात करीत शिक्षणाचा प्रवाह सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला. आता त्यापुढे पाऊल टाकून आनंददायी शिक्षणासाठी पाऊल टाकण्यात आले आहे.

मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती. तेथेच अत्याधुनिक साधने वापरून गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरू आहे.

गटशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रद्धा कुलकर्णी आणि सहायक शिक्षक संचालक नामदेव माळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, प्रगतीचे कौतुक केले आहे. शिक्षक संतोष गुरव, प्रतीक्षा देवळेकर, दीपाली मगदूम, मुख्याध्यापक पाटोळे प्रयत्नशील आहेत.

प्रत्येक भिंतीवर त्रिमितीय चित्रे

  • मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले असून चित्रे रेखाटली जात आहेत.
  • शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे.
  • शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे. शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.  

Web Title: The school looks like a palace, the Zilla Parishad school at Samdoli in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.