डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:03 AM2023-09-27T10:03:48+5:302023-09-27T10:06:59+5:30

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला

The sound of the DJ took their lives; While dancing in the procession, Kesal fell on the spot | डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद (जि. सांगली) : अवघ्या १० दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली असतानाही तो गणेश विसर्जन मिरवणुकीला गेला पण...डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली. शेखर सुखदेव पावशे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरी घटना जिल्ह्यातच दुधारी (ता. वाळवा) येथे घडली. तिथेही आवाजाच्या दणदणाटाने ३५ वर्षीय यवकाचा मृत्यू झाला. 

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला. संपूर्ण गावात डीजेचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात येताच भोवळ येऊन ताे खाली पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तासगावला खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वाळव्यातही एका तरुणाचा मृत्यू 
बोरगाव : दुधारी (ता. वाळवा) येथे प्रवीण यशवंत शिरतोडे (३५) याचा मृत्यू झाला. शिरताेडे याचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. साेमवारी सायंकाळी कामावरून घरी पोहोचला. त्यानंतर  विसर्जन मिरवणुकीत गेला. 
काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने त्याला अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसाेबत नाचत असतानाच चक्कर येऊन खाली पडला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात नेले परंतु डाॅक्टरांनी मृत घोषित केले. 

Web Title: The sound of the DJ took their lives; While dancing in the procession, Kesal fell on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.