मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात नेमकं काय घडलं, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:36 PM2022-09-15T12:36:49+5:302022-09-15T12:38:29+5:30

सांगलीत साधूंना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

The state government has taken serious notice of the beating of sadhu in Sangli. | मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात नेमकं काय घडलं, पाहा

मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात नेमकं काय घडलं, पाहा

Next

माडग्याळ मोरबगी लवंगा (ता. जत) येथे मंगळवारी साधूंना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. साधूंना मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालकांचे पथक दाखल झाले असून, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम ह दिवसभर गावात थांबून घटनेची माहिती घेत होते.

याप्रकरणी सरपंच पुत्रासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सात जणांना अटक केली आहे. सरपंच पुत्र आमसिध्दा तुकाराम जखमी केले. सरगर, लहू रकमी लोखंडे, नागराज पवार, सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मथुरा येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गर्वगिरी महाराज व त्यांचे शिष्य मोटारीने कर्नाटकातील तीर्थक्षेत्र आटोपून विजापूरहून पंढरपूरकडे जात होते. यावेळी मोरबगी लवंगी रस्त्यावर एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला असता मुलाने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

संबंधित साधू हे मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी साधूंना बेल्ट, काठी, चप्पलने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. काही ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांना रोखत पोलिसांना माहिती दिली. मारहाणप्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: The state government has taken serious notice of the beating of sadhu in Sangli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.