सांगलीत वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव, वाचकांशी ऋणानुबंध दृढ करणारा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:11 PM2023-02-17T16:11:42+5:302023-02-17T16:19:15+5:30
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रांतील मान्यवरांची स्नेहमेळाव्यास हजेरी
सांगली : विद्युत रोषणाईचा साज, फुलांची सुंदर आरास, रंगांच्या विविध छटांनी साकारलेली रांगोळी, सनईच्या मंगलमयी सुरावटींच्या सोबतीने सांगलीत गुरुवारी ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा चोविसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, वृत्तसंपादक श्रीनिवास नागे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
सांगलीत माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिशनच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी स्नेहमेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी हास्यकलाकार अजित कोष्टी, नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजपचे अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे उपस्थित होते.
स्नेहमेळाव्यास खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, महापालिका आयुक्त सुनील पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, एसटी महामंडळाचे तंत्र अभियंता अरुण वाघाटे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, दयानंद मलपे, नगरसेवक प्रशांत पाटील, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, किरण सूर्यवंशी, अजित दोरकर, प्रा. पद्माकर जगदाळे, शेखर माने, ॲड. अमित शिंदे, शंभोराज काटकर, सागर घोडके, दिगंबर जाधव, डॉ. संजय पाटील,
उद्योजक उज्ज्वल साठे, डॉ. नथानिअल ससे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहरलाल सारडा, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब होनमोरे, रंगावलीकार आदमअली मुजावर, इतिहास संशोधक सदानंद कदम, सदाशिव मगदूम, शिवाजी त्रिमुखे, डॉ. महेशकुमार कांबळे, शरद सातपुते, डॉ. यशवंत तोरो, धनेश शेटे, किरण मोरे, महेशकुमार चौगुले, संपत कदम, कृष्णात पाटोळे, प्रा. नारायण उंटवाले. प्रा राजपूत, सांगली ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सांगली शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
‘लोकमत’च्या ‘सांगली ट्रेंडस्’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन
‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सांगली ट्रेंडस्’ विशेषांकाचे गुरुवारी थाटात प्रकाशन करण्यात आले.
माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित स्नेहमेळाव्यात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, वृत्तसंपादक श्रीनिवास नागे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त ‘सांगली ट्रेंडस्’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जिल्ह्याने परंपरा आणि नावीन्याची सांगड घालत नानाविध क्षेत्रांतील बदल स्वीकारले. सृजनशीलता आणि सर्जनशीलता सांभाळत गतिमान होताना प्रयोगशीलतेला चालना दिली. या बदलांवर प्रकाशझोत टाकणारा हा विशेषांक वाचकांना गुरुवारी देण्यात आला. गुरुवारी त्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रांतील वाचकांनी विशेषांकाचे कौतुक केले. स्नेहमेळाव्यात वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गणपती मंदिरात कार्यक्रम
सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात गुरुवारी सकाळी ‘लोकमत’च्या विशेषांकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात उपव्यवस्थापक विनायक पाटील, सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र बिरंजे, इस्लामपूरचे विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील आदी उपस्थित होते.