रोहित पाटील यांची संपत्ती ८६ लाख रुपये, एकही गुन्हा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:20 PM2024-10-31T18:20:24+5:302024-10-31T18:22:16+5:30

सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावे स्थावर व जंगम अशी एकूण ...

The wealth of Rohit Patil candidate of the Nationalist Sharad Pawar group in Tasgaon Kavathemahankal constituency is Rs 86 lakhs | रोहित पाटील यांची संपत्ती ८६ लाख रुपये, एकही गुन्हा नाही 

रोहित पाटील यांची संपत्ती ८६ लाख रुपये, एकही गुन्हा नाही 

सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावे स्थावर व जंगम अशी एकूण ८६ लाख ८० हजार ९७५ रुपयांची मालमत्ता आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेचे देणे त्यांच्या नावावर नसल्याची नोंद विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ते प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २०२३-२४ च्या वार्षिक आयकर विवरणपत्रात त्यांनी ८ लाख ८७ हजार ७८८ इतके उत्पन्न दाखविले आहे. त्यांच्या नावे कोणतेही वाहन नसल्याचे नमूद आहे. शेतजमिनीचा तसेच अंजनी येथील निवासी इमारतीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. व्यवस्थापन शास्त्रातील पदवी त्यांनी घेतली आहे. सध्या त्यांचे वय २५ वर्षे आहे.

मालमत्तेचे विवरण असे

  • जंगम मालमत्ता २८,४२,७५५
  • स्थावर मालमत्ता ५८,३८,२२०

Web Title: The wealth of Rohit Patil candidate of the Nationalist Sharad Pawar group in Tasgaon Kavathemahankal constituency is Rs 86 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.