इस्लामपुरात अडीच लाखांची चोरी
By admin | Published: June 2, 2016 01:21 AM2016-06-02T01:21:18+5:302016-06-02T01:21:18+5:30
मुख्याधिकाऱ्यांना इशारा : नगरसेवक अमोल शिंदेंच्या प्रभागातील कामे थांबवली
तासगाव : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल शिंंदे यांच्या प्रभागातील सुमारे ३० लाखांच्या कामांची टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र तत्कालीन प्रभारी नगराध्यक्षा सारिका कांबळे यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर आजअखेर या कामांबाबत कोणताही निर्णय झाल्याने नगरसेवक शिंदे आक्रमक झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गदारोळ केला. राजकीय हेतूने कामे अडवण्याचा उद्योग होत आहे. काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या काळात, पालिकेच्या कामांची टेंडर प्रक्रिया राबविली होती. अमोल शिंदे यांच्या प्रभागातील लांडघोल चौक ते जोग वस्ती कॅनॉलपर्यंतचे डांबरीकरण आणि डॉ. गाढवे दवाखाना ते विनायक पाटील यांच्या घरापर्यंतच ड्रेनेज, अशा सुमारे तीस लाखांच्या कामांची निविदा जाहीर केली होती. मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यानंतर उपनगराध्यक्षा सारिका कांबळे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यकाल होता. त्यांच्याच काळात मुख्याधिकाऱ्यांना संबंधित कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे लेखीआदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक शिंंदे यांच्या प्रभागातील दोन्ही कामांना स्थगिती देण्यात आली.
टेंंडर प्रक्रिया राबवूनदेखील काम न झाल्याने नगरसेवक शिंंदे आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गदारोळ केला. राजकीय हेतूने जाणीवपूर्वक कामे अडवण्याचा उद्योग होत आहे. काम न झाल्यास लोकानां घेवून येथेच तीव्र आंदोलन करेन. कार्यालयात टेबल, खुर्च्या ठेवणार नाही, असे सांगून चांगलाच हंगामा केला.
राजकीय हेतूने कामे अडवण्याचा उद्योग पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. प्रभागातील जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग केला जात आहे. प्रशासन राजकारणास बळी पडले आहे. टेंडर भरतानादेखील सत्तेतील काही लोकांनी पार्टी मिटिंगमध्ये संबंधित काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. टेंडर भरू नका, असे सांगितले होते.
- अमोल शिंंदे, नगरसेवक