वाळेखिंडीत साडेचार लाखांच्या डाळिंबाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:08+5:302021-04-21T04:27:08+5:30

शेगाव : जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील महादेव हिंगमिरे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातील डाळिंबांची चोरी मंगळवारी उघडकीस आली. १३२ रुपये ...

Theft of four and a half lakh pomegranates in Valekhindi | वाळेखिंडीत साडेचार लाखांच्या डाळिंबाची चोरी

वाळेखिंडीत साडेचार लाखांच्या डाळिंबाची चोरी

Next

शेगाव : जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील महादेव हिंगमिरे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातील डाळिंबांची चोरी मंगळवारी उघडकीस आली. १३२ रुपये प्रतिकिलो असा दर मिळालेली साडेचार टन डाळिंबे चोरट्यांनी पळवली असून जाताना त्यांनी शेतमुजरावर दगडफेक केली. महादेव हिंगमिरे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाळेखिंडीपासून दोन किलोमीटरवर दक्षिणेला हिंगमिरे यांच्या मालकीची डाळिंबबाग असून, अडीच हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या डाळिंब विक्रीचा हंगाम सुरू असून १३२ प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने चोरट्यांनी बागेतील डाळिंबाची चोरी केली. झाडे भरपूर असल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला नाही. दरम्यान, सोमवारी रात्री पाऊणच्या दरम्यान चोरटे बागेत आले होते. या वेळी हिंगमिरे यांच्या शेतातील मजूर शहाजी पवार बागेला विद्राव्य खत घालत होते. या वेळी त्याला बागेत काहीतरी आवाज आला. आवाजाच्या दिशेने गेला असता दोन दुचाकीवरून आलेले चोरटे त्याला दिसले. चोरट्यांचा पाठलाग केला असता त्यांनी जोरदार दगडफेक केली. यामध्ये शहाजी पवार यांच्या हाताला व पाठीला मार लागला. त्यानंतर त्यांनी ही घटना हिंगमिरे यांना सांगितली. तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले. चोरट्यांनी आतापर्यंत साडेचार लाखांची साडेचार टन डाळिंबे पळवली आहेत.

शेजारचे शेतकरी भाऊसाहेब सुखदेव यादव यांच्या शेतातील १४ एकर क्षेत्रातील ठिबक सिंचनाचे साहित्य, इंजीन व शेतीचे साहित्य चोरट्यांनी चोरले आहे. यामुळे वाळेखिंडी परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Theft of four and a half lakh pomegranates in Valekhindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.