माधवनगरला दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:20 AM2021-02-01T10:20:43+5:302021-02-01T10:26:50+5:30
Crimenews Sangli-माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगली : माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे
सोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगरमध्ये दत्ताजी साळुंखे यांचे सागर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे साळुंखे यांनी सराफी दुकान उघडले. त्यांनी घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्याची बॅग दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली.
ते दुकानात साफसफाई करत होते. याचवेळी दोन तरुण मोटारसायकलीवरुन त्यांच्या दुकानात आले. चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. त्यामुळे साळुंखे ते पडलेले पैसे घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले. तितक्यात दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करुन आतील बाजूस ठेवलेली सोने आणि चांदीच्या दागिन्याची पिशवी घेतली आणि मोटारसायकलीवरून पळून गेले.
ते तरुण पळून का गेले, हे साळुखे पहात असताना त्यांना त्यांच्या दागिन्याची पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक उमेश चिकणे आणि त्यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.