सांगलीत भरदिवसा चोरट्यांनी उपनिबंधकांचा फ्लॅट फोडला; आठ लाखाचे दगिने, रोकड लंपास
By शीतल पाटील | Published: August 28, 2023 06:01 PM2023-08-28T18:01:26+5:302023-08-28T18:01:49+5:30
सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील उपनिबंधकाचा बंद फ्लॅट भर दुपारी फोडून चोरट्यांनी १२ तोळे सोने, तीन लाखांची रोकड ...
सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील उपनिबंधकाचा बंद फ्लॅट भर दुपारी फोडून चोरट्यांनी १२ तोळे सोने, तीन लाखांची रोकड असा ७ लाख ९० हजार रुपयांचा मुुद्देमाल लंपास केली. ही घटना २७ रोजी घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत दिलीप मनोहर काळे (रा. प्रणाम आर्केड, राम मंदिर नजीक, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. काळे हे हातकणंगले येथे उप निबंधक म्हणून कार्यरत आहेत. २७ रोजी सकाळी ११ च्या सुमारास ते काही कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्याने बनावट किल्लीने कुलूप उघडून आत प्रवेश केला. कपाटातील सात तोळे वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे गंठन, पाच तोळ्याचा १ लाख ७५ हजार रुपयांचा सोन्याचा साज, दोन तोळ्याचा ७० हजार रुपयांंचा नेकलेस आणि रोख तीन लाख असा ७ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास करुन पोबारा केला होता.
दुपारी साडेतीन वाजता ते परत आले असता त्यांना घराचे कुलूप उघडल्याचे दिसून आले. त्यांनी आत जावून पाहिले असता कपाटातील सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. मागील काही महिन्यांपासून शहरातील घरफोडीच्या प्रमाणात वाढ होत झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.