मिरजेत चोरट्यांने पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, हाती काहीच लागले नाही म्हणून..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:38 PM2022-12-26T14:38:58+5:302022-12-26T14:42:22+5:30

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

Theft in the house of a police sub inspector in miraj sangli district | मिरजेत चोरट्यांने पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, हाती काहीच लागले नाही म्हणून..

मिरजेत चोरट्यांने पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, हाती काहीच लागले नाही म्हणून..

Next

सदानंद औंधे

मिरज: मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारी असलेला पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला चोरट्याने फोडला. मात्र चोरट्यास बंगल्यात कोणत्याही मौल्यवान ऐवज हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, संबंधित पोलिस उपनिरीक्षकाचा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारीच बंगला आहे. काही दिवसांपूर्वी ते उमरा यात्रेसाठी सौदी आरेबियाला गेले आहेत. त्यांचा मुलगा व सून तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मित्राकडे गेल्यानंतर घरावर पाळत ठेवलेल्या चोरट्याने शनिवारी मध्यरात्री बंगल्याचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला.  चोरट्याने बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटून दागिने व रोख रक्कमेची शोधाशोध केली. मात्र चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही.

घरातच बसून मद्यपान करुन खाद्यपदार्थावर मारला ताव

किमती ऐवज सापडला नसल्याने चोरट्याने तेथे बसून मद्यपान केले. किचनमधील खाद्यपदार्थावर ताव मारला. त्यानंतर चोरट्याने तेथून पलायन केले. रविवारी शेजार्‍यांना बंगल्याच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. याबाबत उपनिरीक्षकाच्या मुलास माहिती दिल्यानंतर तो घरी परतला. यावेळी घर फोडून चोरट्यांनी साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आले. 

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

चोरट्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. मात्र, पोलिस ठाण्याशेजारी पोलिस उपनिरीक्षकाचाच बंगला फोडल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.

Web Title: Theft in the house of a police sub inspector in miraj sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.