...तर कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:03+5:302021-01-03T04:27:03+5:30
मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनजागृती मेळाव्यात एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला, ...
मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनजागृती मेळाव्यात एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला, यावेळी खासदार शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले. कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. मागील महिन्यात झालेल्या कडेगावमधील बैठकीत सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे आम्ही पदवीधर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला मदत केली. याचा विसर त्यांना पडला आहे.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, एकरकमी एफआरपी न दिल्यास जिल्ह्यातील क्रांती कारखाना, हुतात्मा कारखाना, राजारामबापू पाटील व विश्वास कारखान्यांच्या अध्यक्षांचे पुतळे गावांगावात जाळून, कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.
यावेळी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, युवा आघाडीचे संजय बेले, भरत साजणे, बंडू कागवाडे, सुधीर पाटील, बाबा सांद्रे, नांद्रे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार कोथळे, सावकर पाटील, संजय भोरे, धनपाल पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
कट-कारस्थान
एफआरपी न देण्याचे कट-कारस्थान करणारा मास्टर माईंड कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. योग्य वेळ आल्यानंतर त्या मास्टर माईंडला जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा संदीप राजोबा यांनी इशारा दिला.
फोटो-०१दुधगाव१