...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:33 AM2018-02-26T00:33:45+5:302018-02-26T00:33:45+5:30

... then my car would have been stoned! | ...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

googlenewsNext


सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
हुतात्मा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या खा. शेट्टी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला.
शेट्टी म्हणाले की, शेतकºयांसाठी उभारलेल्या या चळवळीत व्यक्तीव्देषाला कधीच थारा दिला नाही. संघटनेचे आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात नसून, सरकारच्या धोरणाच्याविरोधात आहे. शेतकºयांत सरकारबद्दल असंतोष असून, त्या रोषाला प्रत्येक मंत्र्याला सामोरे जावे लगणार आहे. सरकारकडून शेतकºयांना फसवणुकीचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या सन्मान योजनेतून शेतकºयांचा अपमानच करण्यात येत आहे. तूर खरेदी करताना सांगण्यात एक येते व परिस्थिती वेगळीच आहे. ज्यांच्या विरोधात आज आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीविरोधात आम्ही आंदोलने उभारली होती.
इस्लामपुरात शेट्टींना फिरकू न देण्याचा व ताकारी येथील सभा उधळून लावण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे यावर खा. शेट्टी म्हणाले की, माझा नारदासारखा संपूर्ण राज्यात संचार सुरू असतो. आजवर मला कोणी अडवले नाही आणि पुढेही कोणी अडविण्याची शक्यता नाही.
ते तर खंडणीबहाद्दर!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर येथील कार्यालय फोडण्यात आले. यावर खा. राजू शेट्टी म्हणाले की, कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. बलात्काराच्या आरोपातील, खुनाचे गुन्हे असलेल्या खंडणी बहाद्दरांनी हा हल्ला केला आहे. ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, हे लवकरच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: ... then my car would have been stoned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.