...तर मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू, ३ मेपासून दूधवाटप सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:22 AM2018-05-01T06:22:49+5:302018-05-01T06:22:49+5:30

राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती

... then stop drinking milk supply from Mumbai, Pune, Milkwatap satyagraha from 3 May | ...तर मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू, ३ मेपासून दूधवाटप सत्याग्रह

...तर मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू, ३ मेपासून दूधवाटप सत्याग्रह

Next

सांगली : राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दुधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाहीत. त्यासाठी येत्या ३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची दखल न घेतल्यास मुंबई, पुण्यासह मोठ्या शहराचा दूधपुरवठा रोखला जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.
नवले म्हणाले की, येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संप आणि लाँगमार्चवेळी राज्य सरकारने शेतकºयांच्या मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. सरकारने दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती; पण गेली वर्षभर दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या दुधाचा दर लिटरला १६ ते १७ रुपये इतका आहे.
राज्यात दुधाचा महापूर आल्याचा सरकारचा दावा चुकीचे आहे. शेतकºयांकडून गाय व म्हैशीचे ३.५, ८.५ फॅटचे दूध संकलन करून त्याचे तिप्पट उत्पादन दूध संघातून सुरू आहे. शहरी लोकांना केवळ १.५ फॅटच्या दुधाचे वितरण केले जाते. दुधाची अतिरिक्त निर्मिती ही दूध संघातून होत आहे. त्याला सरकारचे पाठबळही आहे. दुधाचे उत्पादन, वितरण व इतर उत्पादने याची कसलीही आकडेवारी सरकारकडे नाही. आवक कमी व पुरवठा जादा अशी विसंगत परिस्थिती आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कोसळल्याने दूध संघाकडून पावडरची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात दुधाचा अतिरिक्त पुरवठा दिसून येतो. पण हे सत्य सांगण्याचे धाडस भाजप सरकारकडे नाही. त्यासाठी समविचारी संघटनांना सोबत घेऊन दूध उत्पादक संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्यावतीने येत्या ३ ते ९ मे दरम्यान सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून सत्याग्रह आंदोलन केले जाईल. भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकाºयांना निमंत्रित करून त्यांना दुधाचे वाटप केले जाईल, असा इशारा नवले यांनी दिला.

Web Title: ... then stop drinking milk supply from Mumbai, Pune, Milkwatap satyagraha from 3 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.