सांगलीत वातावरणात लहरीपणा, पसरली दाट धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:10 PM2023-01-30T12:10:56+5:302023-01-30T12:11:20+5:30

वातावरणातील या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

there is a wave in the atmosphere In Sangli, Dense fog in the morning | सांगलीत वातावरणात लहरीपणा, पसरली दाट धुक्याची चादर

सांगलीत वातावरणात लहरीपणा, पसरली दाट धुक्याची चादर

Next

सुरेंद्र दुपटे

संजयनगर : सांगली जिल्ह्यात वातावरणातील लहरीपणा कायम असून अचानक आज, सोमवारी शहर व परिसरात पहाटेच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली. तापमानातही काही अंशी घट झाली. यातच हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  

जिल्ह्यात वातावरणात मोठे बदल होत आहेत. सकाळच्या सुमारास धुके, थंडी तर दुपारी उकाडा जाणवत आहे. तर रात्री पुन्हा थंडी जाणवते. वातावरणातील या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. परिणामी ताप, सर्दी, खोकला या आजारात वाढ झाली आहे. 

गेल्या काही दिवसानंतर आज, अचानकच धुके पडल्याने पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून जाताना कसरत करावी लागली. कधी थंडी, सामान्य तापमान, ढगांची दाटी तर धुके अशा विचित्र वातावरणास सांगलीकरांना सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: there is a wave in the atmosphere In Sangli, Dense fog in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.