सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:54 PM2023-01-03T15:54:25+5:302023-01-03T16:39:56+5:30

चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत असल्याने देशभरात सतर्कतेच्या सूचना देण्यात आत्या आहेत

There is no stock of corona vaccine in Shirala of Sangli district! Crowding at vaccination centers for booster doses | सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी

संग्रहीत फोटो

Next

विकास शहा

शिराळा : कोरोनाच्या नव्या लाटेबाबत शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. परंतु, लसीचा साठा नसल्याने लाभार्थ्यांना माघारी जावे लागत आहे.

चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत असल्याने देशभरात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांची पाहणीही करण्यात आली आहे. सध्या कोव्हॅक्सिन लसीचा साठा शिल्लक आहे.

परंतु, कोविशिल्ड लस उपलब्ध नाही. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी प्रशासनाने लसीच्या साठ्याची तरतूद केली होती. मात्र, सामान्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने लससाठा वाया गेला. आता लाेक बूस्टर डाेससाठी येत आहेत. मात्र, लस नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत आहे.

चीनमधील बीएफ ७ हा विषाणू घातक नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीने संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे सामान्यांनी लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. - गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा
 

गर्भवती, सहव्याधीग्रस्त व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. या गटातील व्यक्ती संसर्गाला लगेच बळी पडू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळायला हवे. याखेरीज आवश्यकता भासल्यास कोविड वर्तणुकीचे नियम पाळावेत. देशात ९५ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. अनेकांनी बूस्टर डाेसही घेतला आहे. कोरोना लाटांच्या नियंत्रणाचाही सक्षम अनुभव आपल्याकडील यंत्रणांकडे आहे. त्यामुळे सामान्यांनी बेफिकीर न राहता केवळ नियम पाळावेत. - डॉ. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी.

Web Title: There is no stock of corona vaccine in Shirala of Sangli district! Crowding at vaccination centers for booster doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.