"गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:17 PM2022-06-23T13:17:36+5:302022-06-23T13:22:58+5:30

७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

There should be a memorial near Shenoli for the historic incident of looting of British treasures by blocking the train at Gadkhindi | "गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

"गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

Next

कडेगाव : स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत  रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अशा घटना आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देतात. या शौर्यशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानीच्या स्मरण व्हावे म्हणून शेणोलीजवळ रेल्वे लुटीच्या घटनेचे स्मारक व्हावे असे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

कुंडल तालुका पलूस येथे प्रतिसरकारच्या तुफान दलाचे झुंझार कॅप्टन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर कॅप्टन रामचंद्र लाड यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला. यावेळी  कॅप्टन रामचंद्र लाड जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या हस्ते रोख ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अरुण लाड,  जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, व्याख्याते अविनाश भारती, बाळासाहेब पवार, गौरव नायकवडी,लेखिका कॉ.नमिता वायकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक ढवळे म्हणाले, कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार असलेली क्रांतिभूमी आहे. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच होती. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात भारतभूमीसाठी लढणारे शूर मावळे ही कुंडलची परंपरा आहे.त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी  प्रेरणादायी आहे.असे अशोक ढवळे म्हणाले.

यावेळी तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  शिस्तबद्ध व शानदार संचलन केले.यावेळी अँड दीपक लाड यांनी स्वागत तर जेष्ठ नेते श्रीकांत लाड यांनी प्रास्ताविक केले.यावेळी "नमन स्वातंत्र्याला या विषयी व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान झाले. यावेळी अँड सुभाष पाटील, व्ही वाय पाटील, धनाजी लाड, संताजी लाड, प्रल्हाद पाटील, डॉ.गौरी पाटील, अशोक जाधव, पोपटराव सूर्यवंशी, महादेव लाड, जयवंत आवटे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. यावेळी किरण पाटील, महेश कोडणीकर आणि शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: There should be a memorial near Shenoli for the historic incident of looting of British treasures by blocking the train at Gadkhindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली