दिघंचीत बहुरंगी लढत रंगणार

By admin | Published: January 28, 2017 12:16 AM2017-01-28T00:16:35+5:302017-01-28T00:16:35+5:30

आरक्षणामुळे प्रस्थापितांची पंचाईत : तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

There will be a multi-colored fight in a row | दिघंचीत बहुरंगी लढत रंगणार

दिघंचीत बहुरंगी लढत रंगणार

Next


ंअविनाश बाड ल्ल आटपाडी
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती-जमातीच्या वर्गासाठी आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे भल्याभल्यांची पंचाईत झालेली असताना, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशी बहुरंगी लढत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तिकीट मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
या गटात गेल्या जि. प. आणि पं. स. निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. गेल्यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार अनिल बाबर यांचा गट एकत्र होता, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख तेव्हा विरोधात होते. आता राजेंद्रअण्णा आणि हणमंतराव देशमुख एकत्र आहेत, तर बाबर यांचा गट विरोधात गेला आहे. असे असले तरी इथली निवडणूक मात्र चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व परंपरागत राजकीय गटांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. याच जि. प. गटातून मागील निवडणुकीत निंबवडे पं. स. गणातून भीमराव वाघमारे राष्ट्रवादीतून निवडून आले. नंतर ते उपसभापती झाले. आता आरक्षणामुळे जि. प.साठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम रणदिवे, शाहीर जयवंत रणदिवे, अतुल जावीर या इच्छुकांची राष्ट्रवादीत चर्चा आहे.
शिवसेनेतून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युवकचे तालुका उपाध्यक्ष आणि राजर्षी शाहू विचार मंचचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, माजी उपसभापती अण्णासाहेब रणदिवे, संजय वाघमारे, विनोद बनसोडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपतून शिवाजी ऐवळे, मंगेश रणदिवे हे इच्छुक आहेत, तर कॉँग्रेसमधून अनिल वाघमारे, उध्दव वाघमारे या इच्छुकांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नवनाथ रणदिवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याकडे आता लक्ष लागले आहे.
आरक्षणामुळे पुढाऱ्यांच्या होम मिनिस्टरना संधी
दिघंची जि. प. गटातील निंबवडे गणासाठी सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहे. त्यामुळे या गटात भाजपमधून जयवंत सरगर, राष्ट्रवादीतून आवळाईचे उपसरपंच गजेंद्र पिसे, शिवसेनेतून गळवेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब गळवे, माजी जि. प. सदस्य जनार्धन झिंबल यांच्या सौभाग्यवतींना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिघंची पं. स. गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातही पुढाऱ्यांच्या होम मिनिस्टरना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.
राजकीय समीकरणांची उलथापालथ
गेल्या जि. प. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या जयश्री श्रावण वाक्षे यांची उमेदवारी आरक्षणामुळे करगणी जि. प. गटात होण्याची शक्यता आहे, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या जयमाला हणमंतराव देशमुख (४५१९ मते) आता राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतृत्व गेल्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी केले होते. ते सध्या भाजपचे नेतृत्व करीत आहेत.

Web Title: There will be a multi-colored fight in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.