गु-हाळांच्या चिमण्या थंडच : उसाचेही संकट; गुळाचे उत्पादन घटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:45 PM2019-11-05T23:45:32+5:302019-11-05T23:46:57+5:30
सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो. यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत.
संतोष भिसे ।
सांगली : महापुराने गुºहाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुºहाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुºहाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.
सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो. यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत. पुराने गुºहाळघरांची प्रचंड पडझड झाली. कर्नाटकात हजारो एकर ऊस पाण्याखाली गेला. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने गळीत सुरु झाले नाही. रानात चिखल आणि पाणी साचून असल्याने तोडी ठप्प आहेत. या संकटग्रस्त स्थितीत गळीत कसे सुरु करायचे, हा प्रश्न गुºहाळमालकांपुढे आहे. जुलैपासून सांगली बाजार समितीत गुळाची आवक घटली आहे, त्यामुळे दर देखील तेजीत आहेत.
गुळाची आवक (क्विंटल)
जुलै - रवे - २६ हजार ८०३, भेली - ५२ हजार ९३२. आॅगस्ट - ३० हजार ५१६, भेली - ४३ हजार ९०१. सप्टेंबर - २९ हजार ८४३, भेली- ४१ हजार ८३६. आॅक्टोबर - २६ हजार ६४३, भेली - ३९ हजार २७६.
आॅक्टोबरमध्ये : दरात घसरण
जूनमध्ये गुळाला ३ हजार ७०८ रुपये क्विंटलला भाव मिळाला होता. जुलैमध्ये ३ हजार ६७२, आॅगस्टमध्ये ४ हजार २५४ व सप्टेंबरमध्ये ४ हजार १० रुपये भाव मिळाला. आॅक्टोबरमध्ये आवक घटल्याने भाव ४,२०० रुपयांपर्यंत गेले.
यंदा गुळासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होईल याचा भरवसा नाही. त्याचा परिणाम आवकेवर होऊ शकतो. चार महिन्यात चांगला दर मिळाला. कर्नाटकात उसाच्या नुकसानीने उत्पादन घटू शकते.
- जे. के. पाटील, सहायक सचिव, बाजार समिती, सांगली
शिराळ्यात अवघी सात-आठ गुºहाळे उरली आहेत. महापुरात मांडवात पाणी भरले, जळण भिजले. ऊसही पाण्यातच आहे. हंगाम अद्याप सुरू नाही. काटा पेमेन्ट देऊनही उसाचा भरवसा नाही. शासनाने उद्योगाला हात द्यावा. - जालिंदर शेळके , गुºहाळचालक, पुनवत (ता. शिराळा)