सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 01:22 PM2022-07-30T13:22:29+5:302022-07-30T13:22:58+5:30
चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
संजयकुमार गुरव
डफळापूर : सांगली जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. अशातच आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास जत तालुक्यातील डफळापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झाला.
डफळापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम मशिन आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी संबंधित कर्मचाऱ्यांनी या मशीनमध्ये पैशांचा भरणा केला होता. अन् आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हे मशीन फोडण्याच प्रयत्न केला. कारमधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एटीएमच्या खोलीत प्रवेश केला व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली. तर एटीएम मशीन दोरीच्या सहाय्याने कारला बांधून पळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मशीनच फोडता न आल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार झाले. ही घटना नजीकच्या बझार मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आज, सकाळी ही घटना नागरिकांच्या निदर्शनास आली. जत पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.