‘म्हैसाळ’बाबत त्रयस्थ समिती नेमा

By admin | Published: March 13, 2017 11:05 PM2017-03-13T23:05:07+5:302017-03-13T23:05:07+5:30

ग्रामस्थांची मागणी : जयंत पाटील, सुमनताई पाटील यांची म्हैसाळला भेट

The third committee about 'Mhaysal' | ‘म्हैसाळ’बाबत त्रयस्थ समिती नेमा

‘म्हैसाळ’बाबत त्रयस्थ समिती नेमा

Next

म्हैसाळ : भ्रूणहत्या प्रकरणाची सखोल माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांनी रविवारी सायंकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एक तास ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराची माहिती दिली. या प्रकरणातील चौकशी समिती रद्द करुन त्रयस्थ समितीची मागणी करण्यात आली.या भेटीप्रसंगी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला गेला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे व आरोग्य अधिकारी राम हंकारे यांनी जयंत पाटील यांना या प्रकरणातील आरोग्य विभागाशी निगडीत गोष्टींची माहिती दिली. ग्रामस्थांनी या प्रकरणातील चौकशी समिती रद्द करुन त्रयस्थ समितीची मागणी केली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व सदाभाऊ खोत यांनी म्हैसाळला भेट दिली; पण घटनेची पूर्ण माहिती न घेता धावता दौरा केला. सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर आरोग्य विभागाबाबत महत्त्वाच्या मागण्या करणार होत्या, पण आरोग्य मंत्र्यांनी समस्या ऐकून न घेताच पळ काढला, असे ग्रामस्थांनी सांगितले. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री सुभाष देशमुख म्हैसाळ येथे घटनास्थळी फिरकेलच नाहीत. याबाबतही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आ. जयंत पाटील व आ. सुमनताई पाटील यांनी दिले. यावेळी मनोज शिंदे, परेश शिंदे, बाळासाहेब व्होनमोरे, संजय बजाज, अभिजित हारगे, रणजित पाटील, संजय साळुंखे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


सरकारला गांभीर्य नाही
आ. जयंत पाटील म्हणाले की, सत्तेत असणारे भाजपचे मंत्री सांगलीत येतात. घटनेबद्दल घटनास्थळी जाऊन नागरिकांशी कोणताही संवाद साधत नाहीत. उलट ते म्हैसाळला न भेट देताच निघून जातात. यावरुनच हे सरकार गंभीर नसल्याचे दिसते. या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेत करणार आहे.
उलटसुलट चर्चा
आ. जयंत पाटील व आ. सुमनताई पाटील या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले. पण वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या बाहेरुनच परत जावे लागले. यावरुन ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा सुरु होती.

Web Title: The third committee about 'Mhaysal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.