सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:09+5:302021-05-20T04:29:09+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती सुधारत असल्याचे चित्र असून सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी दिवसभरात ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती सुधारत असल्याचे चित्र असून सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी दिवसभरात १३०१ जणांना कोरोना झाला असून १७३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांची संख्याही घटताना परजिल्ह्यातील १० जणांसह जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपासून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारीही हीच सकारात्मक आकडेवारी कायम होती. जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली १, वाळवा तालुक्यात ७, खानापूर व मिरज तालुक्यात प्रत्येकी ६, कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव, तासगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ६३६ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३७९२ जणांच्या तपासणीतून ७७९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या १३ हजार ७८४ जण उपचार घेत आहेत त्यातील २३३४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २०४६ जण ऑक्सिजनवर तर २८८ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १० जणांचा मृत्यू झाला असून नवीन ११४ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,०४,२०७
उपचार घेत असलेले १३,८७४
कोरोनामुक्त झालेले ८७,२८७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,०४६
बुधवारी दिवसभरात
सांगली ७६
मिरज ६९
जत १८८
मिरज तालुका १३३
खानापूर १३१
वाळवा १२८
तासगाव १२७
कवठेमहांकाळ ११७
आटपाडी ९१
पलूस ९०
कडेगाव ७७
शिराळा ७३