सांगलीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात तेरा जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:17+5:302021-05-12T04:28:17+5:30
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगरमधील तीन पानी जुगार अड्डा शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. १३ जुगाऱ्यांवर अटक केली. २ लाख ...
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगरमधील तीन पानी जुगार अड्डा शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. १३ जुगाऱ्यांवर अटक केली. २ लाख १५ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भारतनगरमध्ये तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळाली. छाप्यावेळी तेरा जण सापडले. त्यांच्याकडून १० मोबाइल, ४ दुचाकी आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाख १५ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, सहायक पोलीस फौजदार शिंदे, दिलीप जाधव, विजय कारंडे, दीपक कांबळे, अपर्णा बुधगावकर, विक्रम खोत, अक्षय कांबळे, महेश गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
जुगारी असे : विशाल महादेव पवार (वय ३७), रवींद्र भीमराव परीट (वय ३८), अविनाश चंद्रकांत कोटकर (वय २४), संकेत किशोर गायकवाड (वय २८), प्रशांत काशिनाथ कुदळे (वय २४), इम्रान महंमद शेख (वय २५), राजू आप्पासाहेब कदम (वय ३४), ओंकार महादेव पवार (वय ३५), आकाश विनायक पवार (वय २९), सुधीर पांडुरंग सावंत (वय २९), संदीप प्रकाश हात्तळगे (वय ३१), केतन किशोर गायकवाड (वय २९), प्रदीप प्रकाश हात्तळगे (वय ३३, सर्व रा. कोल्हापूर रस्ता, भारतनगर, सांगली).