साडेबारा हजारांची चिल्लर देत उमेदवाराने भरला अर्ज -प्रशासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:17 AM2019-04-02T00:17:05+5:302019-04-02T00:17:41+5:30

सांगली : एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेल अशा पध्दतीने सोमवारी उमेदवाराने लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. अभिजित आवाडे-बिचकुले यांनी अर्जासोबत द्यावयाची ...

 Thirteen thousand rupees cheerleader giving the application filled with tension | साडेबारा हजारांची चिल्लर देत उमेदवाराने भरला अर्ज -प्रशासनाची दमछाक

साडेबारा हजारांची चिल्लर देत उमेदवाराने भरला अर्ज -प्रशासनाची दमछाक

googlenewsNext
ठळक मुद्देअभिजित बिचकुले यांनी भरली -अनोख्या पध्दतीने अनामत रक्कम

सांगली : एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेल अशा पध्दतीने सोमवारी उमेदवाराने लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. अभिजित आवाडे-बिचकुले यांनी अर्जासोबत द्यावयाची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात आणली होती. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत अमानत रक्कम म्हणून २५ हजाराची चिल्लर आणली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडून केवळ साडेबारा हजाराची चिल्लर स्वीकारली. अनामत रकमेच्या चिल्लरची मोजणी करताना कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक झाली.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेतही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अनामत रक्कम चक्क दोन पिशव्यांतून चिल्लर स्वरूपात आणली होती. याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, चिल्लर जमा करणे हा माझा छंद आहे. लहानपणापासूनच मी चिल्लर संकलित करत आलो आहे. मी २५ हजारांची नाणी आणली होती. मात्र त्यातील साडेबारा हजाराची चिल्लरच स्वीकारण्यात आली आहे. सांगली मतदारसंघात खासदारांनी तोंड दाखविलेले नाही. त्यामुळे मी निवडणुकीस उभा आहे. बिचकुले यांनी अनामत रक्कम म्हणून चिल्लर आणल्याने, ती मोजताना कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक झाली.

यापूर्वीही निवडणुकीत उमेदवारी
अभिजित वामनराव बिचकुले मूळचे सातारा जिल्ह्यातील असले तरी त्यांची सासूरवाडी देवराष्टÑे आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नीने खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. तसेच माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याकडून अर्ज भरण्यात आला होता.

Web Title:  Thirteen thousand rupees cheerleader giving the application filled with tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.