‘थर्टी फर्स्ट’ला बेशिस्त वाहनचालकांना तीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:19+5:302021-01-03T04:27:19+5:30
सांगली : थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी बाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केली. त्यामुळे अनेकांना नववर्षाची ...
सांगली : थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी बाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केली. त्यामुळे अनेकांना नववर्षाची सुरुवात पोलीस ठाण्याच्या दारात करावी लागली. ३१ डिसेंबरला वर्षअखेरला सांगली वाहतूक शाखेने २२५ कारवाया करत ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर १५ केसेस करण्यात आल्या आहेत. जिल्हाभर झालेल्या कारवाईत १०३१ केसेस करत तीन लाख १०० रुपयांचा दंड करण्यात आला.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी थर्टी फर्स्ट दिवशी जिल्हाभर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळपासूनच पोलीस रस्त्यावर असल्याने हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसला होता.
जिल्ह्यात ३१ डिसेंबरला १०३१ केसेस दाखल करून एकूण ३ लाख दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविण्याचा ३५ केसेस दाखल करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून ही कारवाई सुरू होती. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी दिली.
चौकट
पोलिसांनी केलेल्या कारवाईची संख्या
मद्यप्राशन ३५
मोबाईल संभाषण २२
विना सीटबेल्ट २२
ट्रिपल सीट २९
धोकादायकरित्या वाहन चालवणे १४
नंबरप्लेट ३२
मॉडीफाय सायलेन्सर ३