एकतीस हजार बांधकाम कामगारांना मिळणार दीड हजार, नोंदणी नसलेल्यांचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:16+5:302021-04-16T04:26:16+5:30
सांगली : कोरोना काळातील मदत म्हणून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील ...
सांगली : कोरोना काळातील मदत म्हणून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत व नूतनीकरण झालेल्या ३१ हजार कामगारांना याचा लाभ मिळणार असून, नोंदणी न झालेल्या जवळपास ४९ हजार बांधकाम कामगारांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
यापूर्वी राज्य शासनाने ५ हजार रुपयांची मदत मागील कोरोना काळासाठी जाहीर केली होती. त्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. आता नव्याने दीड हजार जाहीर केले असले तरी त्या लाभापासून अनेकजण वंचित राहणार आहेत. नूतनीकरणाची ऑनलाईन प्रक्रिया राबविली असली तरी यंत्रणेच्या मंदगती कारभारामुळे राज्यात सर्वत्र नूतनीकरण रेंगाळले आहे. त्याचा फटका कामगारांना बसत आहे.
कोट
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करीत असलो तरी शासनाच्या योजनांबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. कोणी नोंदणी करण्याविषयी माहितीही दिली नाही. आता मदत केवळ नोंदणी करणाऱ्यांनाच का?
- यल्लाप्पा बिरुनगी, बांधकाम कामगार
कोट
गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही सांगलीत बांधकामावर काम करीत आहोत. कर्नाटकातून आमचे कुटुंब महाराष्ट्रात आले आहे. मात्र, कागदपत्रांमुळे अडचणी येतात. त्यामुळे नोंदणी होत नाही व लाभही मिळत नाही.
-ज्ञानेश्वर पुंजागोळ, बांधकाम कामगार
कोट
बांधकाम कामगार म्हणून काम करीत असतानाही आम्हाला कोणताच लाभ मिळत काही. वर्षानुवर्षे आम्ही हे काम करतोय. पण, नोंदणी नसल्याने लाभ दिले जात नाहीत. आमच्यासारख्या लोकांनी कसे जगायचे.
- शेट्याप्पा कांबळे, बांधकाम कामगार
चौकट
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या
नोंदणीकृत व अपडेट ३१,०००
नूतनीकरण नसलेले ४९,०००