तीस हजारांची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:35+5:302021-01-04T04:23:35+5:30
तासगाव : येथील डाेर्ली फाटा परिसरातील सुहास राजाराम शिंदे यांच्या औषध दुकानाचा पत्रा कापून चाेरट्यांनी तीस हजार रुपयांची राेकड ...
तासगाव : येथील डाेर्ली फाटा परिसरातील सुहास राजाराम शिंदे यांच्या औषध दुकानाचा पत्रा कापून चाेरट्यांनी तीस हजार रुपयांची राेकड लंपास केली. ही घटना १ जानेवारीला मध्यरात्रीनंतर घडली. याबाबत शिंदे यांनी तासगाव पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात फिर्याद दिली आहे.
---------------
लॅबमधून राेकड लंपास
पलूस : येथील पूर्वी पवार हॉस्पिटलमधील दिया लॅबमधून ३४ हजार २९० रुपयांची रक्कम चाेरीस गेली आहे. याबाबत याेगेश चंद्रकांत पाटील (वय ३४. रा. येळावी. ता. तासगाव) यांनी सिद्धार्थ शांताराम सातपुते (रा. बुर्ली, ता. पलूस) याच्यावर संशय व्यक्त केला असून पलूस पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
----------------
मुकादमांकडून कंत्राटदारांची २५ लाखांची फसवणूक
भिलवडी : ऊसताेडणी कामगार पुरविण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ऊसताेडणी कंत्राटदार राजाराम अण्णा सावंत (वय ७३, रा. राडेवाडी. संतगाव, ता. पलूस) यांनी चाैघा मुकादमांविराेधात पलूस पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रदीप रामराव राठाेड (वय ३०), संदीप रामराव राठाेड (दाेघेही रा. कृष्णा, पाे. उकळी, ता. वाशिम, जि. वाशिम), विलास दाैलत मुंडे (४२, रा. धारूर, जि. बीड) व विष्णू सुभाष चव्हाण. (६३, रा. शवगळतांडा, पाे. पाेनेवाडी, ता. धनसागवी. जि. जालना) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप राठाेड याने ऊसताेड मजूर पुरविण्यासाठी ६ लाख १२ हजार रुपये. तर संदीप राठाेड याने ५ लाख ५० हजार रुपये नाेटरी करून घेतले आहेत तसेच विलास मुंडे याने ६ ला ३० हजार रुपये तर विष्णू चव्हाण याने ६ लाख ५५ हजार रुपये नाेटरी करून घेतले परंतु मजूर पुरविले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे राजाराम सावंत यांनी पलुस पाेलिस ठाण्यात त्यांच्याविराेधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
--------------------
अल्पवयीन मुलीचे अपहरण
तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना २ जानेवारी राेजी घडली. याप्रकरणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी तासगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.
--------------------
फसवणूकप्रकरणी ऊस मुकादमावर गुन्हा
तासगाव : मांजर्डे (ता. तासगाव) येथील ऊस ताेडणी कंत्राटदार दत्तात्रय संपतराव माेहिते (वय ४२) यांची ऊस ताेडणी कामगार पुरविण्याचे आमिष दाखवून २५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी माेहिते यांनी नवनाथ बाबूराव सपाटे (रा. तुकड गल्ली. धारुर. जि. बीड) या मुकादमाविराेधात शनिवारी तासगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऊस ताेडणीसाठी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून नवनाथ सपाटे याच्यासह सचिन बाबूराव जाधव, श्रीमंत मरीबा आरगडे, दिनकर दत्तात्रय पाटील यांनी माेहिते यांच्याकडून २५ लाख ४० हजार रुपये घेतले. मात्र, मजूर पुरविले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे परत केले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माेहिते यांनी शनिवारी तासगाव पाेलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
----------------
जमिनीच्या वादातून हद्दीचे खांब ताेडले
पलुस : पलूस येथे जमिनीच्या वादातून एकास शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हद्दीच्या खुणा दाखविण्यासाठी राेवलेले खांब ताेडण्यात आले. ही घटना ३१ डिसेंबरला घडली. याप्रकरणी पांडुरंग मारुती गायकवाड (वय ८३, रा. पलूस) यांनी महादेव राजाराम गायकवाड, वसंत राजाराम गायकवाड, गणेश वसंत गायकवाड, सविता वसंत गायकवाड (सर्व रा. इनामपट्टा, पलूस) यांच्याविराेधात फिर्याद दाखल केली आहे.
------------------
ऊस मुकादमाकडून पाच लाखांची फसवणूक
विटा : ऊस ताेडणीसाठी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावंता परसु माळी (वय ६०, रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) यांची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माळी यांनी शनिवारी बाळू श्रीराम राठाेड (रा. मारवाडी खुर्द, राेहडा, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्याविराेधात विटा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
---------------
ऊस मुकादमाकडून तीन लाखांची फसवणूक
कडेगाव : ऊसताेडणीसाठी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सिध्दार्थ सर्जेराव पवार (वय ३७. रा. तडसर. ता. कडेगाव) यांची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पवार यांनी शनिवारी बंडू दादाराव पालकर (३८, रा. सारदरी धारूर, जि. बीड) याच्याविराेधात कडेगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
--------------------
ऊस मुकादमाकडून पाच लाखांची फसवणूक
विटा : ऊस ताेडणीसाठी मजूर पुरविण्याच्या आमिषाने पतंगराव गणपती महाडिक (वय ४३, रा. नेवरी, ता. कडेगाव) यांची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी महाडिक यांनी शनिवारी विकास अमरसिंह चव्हाण (रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्याविराेधात विटा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
--------------
दुचाकी लंपास
विटा : येथील विटा अर्बन बँकेसमाेरून २२ हजारांची दुचाकी (क्र. एमएच १० बीएन ०५३८) लंपास करण्यात आली. ही घटना १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी स्वरुप सदाशिव चाैगुले. (रा. घुमटमाळ, विटा, सध्या शिवाजीनगर विटा) यांनी अज्ञात चाेरट्यांविराेधात विटा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
-----------------
ऊस मुकादमाकडून पाच लाखांची फसवणूक
कडेगाव : ऊस ताेडणीसाठी मजूर पुरविण्याच्या आमिषाने बबन मारुती महाडिक (वय ६०. रा. नेवरी. ता. कडेगाव) यांची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी महाडिक यांनी शनिवारी विकास अमरसिंह चव्हाण (४८, रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्याविराेधात कडेगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
---------------