व्यापारी बंदने सांगली मार्केट यार्डात तीस कोटीची उलाढाल ठप्प -हळद, गूळ, बेदाण्याच्या ऐन हंगामात सौदे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:14 AM2019-01-19T00:14:43+5:302019-01-19T00:15:39+5:30

केंद्रीय जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांमुळे मार्केट यार्डातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दररोज होणारी पाच कोटींची उलाढाल थांबल्याने मार्केट यार्डातील व्यवहारांवर अवलंबून असलेल्या घटकांचेही व्यवहार थांबले आहेत. हळद, गूळ व बेदाण्याचा हंगाम

Thirty-three turnover in Sangli market yard closed, deals closed | व्यापारी बंदने सांगली मार्केट यार्डात तीस कोटीची उलाढाल ठप्प -हळद, गूळ, बेदाण्याच्या ऐन हंगामात सौदे बंद

व्यापारी बंदने सांगली मार्केट यार्डात तीस कोटीची उलाढाल ठप्प -हळद, गूळ, बेदाण्याच्या ऐन हंगामात सौदे बंद

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करत तातडीने सौदे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सांगली : केंद्रीय जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांमुळे मार्केट यार्डातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दररोज होणारी पाच कोटींची उलाढाल थांबल्याने मार्केट यार्डातील व्यवहारांवर अवलंबून असलेल्या घटकांचेही व्यवहार थांबले आहेत. हळद, गूळ व बेदाण्याचा हंगाम आताच सुरूच झाला असताना, पहिल्याच महिन्यात व्यापार बंदचा ‘खडा’ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. व्यापाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करत तातडीने सौदे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सेवा कराच्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी सोमवार दि. १४ पासून बेमुदत व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नेहमीच गजबज असलेले मार्केट यार्ड ओस पडले आहे. मार्केट यार्डात दिवसाला सरासरी पाच कोटींची उलाढाल होते. ऐन हंगामात उलाढालीत वाढ होत असते. मार्केट यार्डातील कोणताही व्यापार घेतला, तर त्यात फार मोठी साखळी कार्यरत असते. एका हळदीचा विचार केला, तर २३ ते २५ घटकांची गुजराण हळदीच्या माध्यमातून होत असते.

या महिन्यापासूनच हळद व गुळाचा नवीन हंगाम सुरू होतो. आवक मर्यादित असली तरी सुरूवातीला समाधानकारक दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी पहिल्या टप्प्यात शेतीमाल विक्रीसाठी आणत असतात. याच कालावधित व्यापार बंद असल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.

व्यापाºयांना बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांबाबत त्यांनी आपले म्हणणे मांडल्याने व्यापाºयांवरही अन्याय होता कामा नये, अशी भूमिका शेतकरी, हमाल, तोलाईदारांसह इतर घटकांनी मांडली आहे.
व्यापाºयांच्या प्रश्नावर निर्णय होऊन ज्यावेळी बाजारपेठ सुरू होईल, त्यावेळी एकदमच मालाची आवक वाढून दर घटणार असल्याने शेतकºयांना नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे शेतकरीवर्ग दुहेरी कात्रीत सापडला आहे.

सध्या बाजार समितीत हळद व गुळाचे दररोज सौदे होतात, तर बेदाण्याचे सौदे बुधवार व शुक्रवारी होतात. हे सौदे पाच दिवसांपासून बंद आहेत. सोयाबीनचीही आवक होत असताना, त्याचेही सौदे बंद आहेत.

सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील
व्यापाºयांच्या बंदमुळे व्यवहार पूर्णपणे थांबले असले तरी लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. नोटिसा रद्द व्हाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शेतकरी व मार्केट यार्डातील सर्वच घटकांवर अन्याय होणार नाही यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे, असे मत बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी व्यक्त केले.
 

शेतकºयांचे नुकसान व्हावे अशी कोणत्याही व्यापाºयांची अपेक्षा नसते. परंतु, सेवा कराच्या नोटिसांमुळे नाहक व्यापाºयांना त्रास दिला जात आहे. याविरोधात दाद मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीच आता लवकरात लवकर तोडगा काढून व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स

व्यापार बंदमुळे कष्टकºयांचा पूर्णपणे रोजगार थांबला आहे. रोज १५ लाखांचे नुकसान होत आहे. हमाल, महिला माथाडी कामगार, गाडीवान, हळद, गुळाच्या कामगारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पण व्यापाºयांचीही मागणी योग्य असल्याने नोटिसा रद्द करण्याविषयी शासनाने कार्यवाही करत कष्टकºयांची अडचण सोडवावी.
- विकास मगदूम,  हमाल पंचायत, सांगली.


देशभरातील कोणत्याही व्यापाºयांना सेवा कराच्या नोटिसा नसताना सांगलीतीलच व्यापाºयांना नोटिसा, हे अन्यायकारक आहे. कृषी बाजारपेठेत व्यापारी हा घटक महत्त्वाचा असल्याने त्यावर अन्याय होऊ नये. त्याचवेळी बंद लांबल्याने शेतकºयांचेही नुकसान होणार नाही यासाठी शासनाने तोडगा काढावा.
- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

Web Title: Thirty-three turnover in Sangli market yard closed, deals closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.